Header Ad

WTC: विराट-पुजारा मैदानावर; पहिल्या सत्रावर न्यूझीलंडचं वर्चस्व



ICC World Test Championship Final : विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आर्धा तास लवकर खेळाला सुरुवात केली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक गमावली आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे. पावसामुळे साउदम्टनमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजाला मदत करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
  • 1.       पहिल्या सत्रावर न्यूझीलंडचं वर्चस्व
               रोहित-गिल यांनी सावध सुरुवात करत भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली होती. मात्र, रोहित-गिल यांना एकापाठोपाठ एक बाद करत न्यूझीलंडने पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवलं आहे. सध्या विराट कोहली आणि चेतेश्व पुजारा खेळत आहे. पहिल्या सत्रा अखेर भारतानं 28 षटकांत दोन बाद 69 धावा केल्या आहेत. रोहित(34) आणि गिल(28) यांनी अर्धशतकी भागिदारी केली होती.
    2.       भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद
               आश्वासक सुरुवातीनंतर जेमिसन यानं रोहित शर्माला झेलबाद करत पहिला धक्का दिला आहे. रोहित शर्मा 37 धावांवर बाद झाला. 20 षटकानंतर भारतीय संघानं एक गड्याच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत. पुजारा आणि गिल मैदानावर आहेत.
    3.       शुबमन गिलला वॅगनरने केलं बाद
             रोहित शर्मापाठोपाठ सलामी फलंदाज शुबमन गिलही बाद झाला आहे. वॅगनर याने गिल याला केलं झेलबाद. कोहली आणि पुजारा अनुभवी जोडी मैदानावर

Powered by Blogger.