आधार कार्ड(Aadhar card) हे भारतामध्ये खूप महत्वाचे ओळखपत्र म्हणून मानले जाते. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. बँक खाते उघडणे, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन सिम कार्ड खरेदी करणे, पीएम किसान योजना(PM Kisan Yojana)आणि पीएम आवास योजना(PM Aawas Yojana) यांसारख्या योजनांतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड आवश्यक आहे.पण जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला अपडेट केलेला नसेल तर खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स पूर्ण करा.
आधार क्रमांक जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की जर तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या आधार कार्डशी जोडला गेला असेल तर तुम्ही मोबाइल OTP वरून पडताळणी करून तुमच्या कार्डवर असलेल्या माहितीमध्ये बदल करू शकता. UIDAI नुसार तुमच्या आधार कार्डमधील मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.
मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक करण्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे (How to Link Mobile no to Aadhar Card Process Online)
1: जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा आधार अपडेट केंद्राला भेट द्या.
2: आधार अपडेट फॉर्म भरा.
3: आधार अपडेट फॉर्ममध्ये तुमचा अपडेट केलेला मोबाईल नंबर टाका.
4: यानंतर, आधार सेवा केंद्रावर 50 रुपये शुल्क भरा.
5: आधार तुमची विनंती सेवा केंद्रावर कर्मचारी बायोमेट्रिक द्वारे नोंदवेल.
6: यानंतर, तुम्हाला एक पोचपावती स्लिप मिळेल, ज्यामध्ये युनिक रेफरन्स नंबर (URN) टाकला आहे.
7: या URN द्वारे, तुम्ही तुमच्या विनंतीच्या स्थितीची माहिती करून घेऊ शकता.