Header Ad

मुंबई क्रूझ ड्र्ग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदार,किरण गोसावीला अखेर पुणे पालिसांकडून अटक


पुणे। मुंबई क्रूझ ड्र्ग्स प्रकरणी शाहरुखनाचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. मात्र या प्रकरणाला रोज नवे वळण मिळताना दिसतेय. याप्रकरणातील साक्षीदार (पंच) किरण गोसावीवर त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने वसुलीचे आरोप केले आहे. तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील गोसावीविरोधात फसवणूकीचे आरोप केले. मात्र तेव्हापासून फरार असलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावीने सरेंडर केलं नसून त्याला इंटलिजेंसच्या आधारे अटक केल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. पुणे पोलिसांकडून त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

फसवणूकीप्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा

आज ११ वाजता पोलिसांकडून किरण गोसावीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.तसेच त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार असून एनसीबीकडूनही त्याची चौकशी होणार आहे.प्रभाकर साईल आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एक पंच आहे. तर दुसरा पंच किरण गोसावी याचा तो बॉडीगार्ड म्हणून देखील काम करत होता. मात्र प्रभाकर साईलने जेव्हा के.पी गोसावीवर या प्रकरणात पैसे घेतल्याचे आरोप केले तेव्हापासून गोसावी फरार होता. तो लखनऊमध्ये असल्याची माहिती त्यानंतर समोर आली होती. पंच प्रभाकर साईलच्या गौप्यस्फोटानंतर पंच गोसावीची या प्रकरणातील अटक निश्चित होती. पुणे पोलिसांच्या एक पथकाने गोसावीला अटक करण्यासाठी लखनऊ गाठले आणि त्याला ताब्यात घेतले. गोसावीवर आत्तापर्यंत चार विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणांचा देखील तपास सुरु आहे. फसवणूकीप्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल आहे.


Powered by Blogger.