Header Ad

राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का : चित्रा वाघ



मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: त्यांची गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरला गेले होते. त्यावरुन मुख्यमंत्र्यांना अपघातग्रस्तांकडे यायला वेळ नाही, पण पंढरपूरला जायला वेळ आहे, अशी विरोधकांकडून टीकाही झाली होती. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

                                                       

 

महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. रायगड, रत्नागिरीत, चिपळुनमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. गावच्या गावं पाण्याखाली गेल्याने नागरिकांसमोर मोठं संकट उठं टाकलं आहे. इतकी भीषण परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांनी अजून कोकणाचा दौरा केला नाही. त्यावरुन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आता आहे. ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का?', असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.


Powered by Blogger.