Header Ad

आमदार सुनील टिंगरेंनी पुरग्रस्तांसाठी दिले साडेचार हजार किराणा किट



 पुणे : महापुराने संकटात सापडलेल्या कोकणवासीयासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे आणि मित्र परिवार यांच्यावतीने साडेचार हजार कुटूंबाना किराणा सामानाचे किट आणि दोन हजार संसारउपयोगी भांड्याचे किट यांची मदत देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे साहित्य घेऊन जाणाऱ्या 20 ट्रकला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून मदत मोहिमेची सुरवात केली.

कोकण, कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान उपमुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे आणि त्यांच्या मित्र परिवाराने तातडीची मदत गोळा केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी या मदतीच्या उपक्रमाचे कौतुक केले, सर्वांनी अशाच पध्दतीने मदतीचा हातभार लावावा असे आवाहन केले. 



पुरग्रस्तांना पाठविण्यात आलेल्या साडेचार हजार अन्नधान्य किटमध्ये 1 तांदूळ 10 किलो, गव्हाचे पीठ 5 किलो, तूरडाळ 1 किलो, साखर 1 किलो, साबण 2, गोडेतेल, टुथपेस्ट, खोबरेल तेल, कांदा मसाला, हळद, लाल मिर्ची पावडर चहा पावडर, मीठ तसेच 2 हजार भाड्यांच्या किटमध्ये संसार उपयोगी वेगवेगळी 15 साहित्य पाठविण्यात आली.

Powered by Blogger.