Header Ad

महाराष्ट्रात एका दिवसात 801,847 लसीकरण करण्याचा नवा विक्रम

 

 

शनिवारी महाराष्ट्रात  801,847. लसींकरण करण्यात आले असून, एकाच दिवसात इतर राज्यांपेक्षा सर्वात जास्त लसीकरण करण्याची नोंद झाली आहे. तरीही कोविड -19 चे राज्यात 9489 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या एकूण डोसची संख्या आता, 33,911,029. वर पोहोचली आहे.

'तरीही पुन्हा कोविड -19 लसीकरणांच्या बाबतीत आम्ही आमच्या मागील उत्तम कामगिरीला ही मागे टाकत नवीन विक्रम नोंदवला आहे.आम्ही तीन महिन्यांहून अधिक काळ लसीकरणामध्ये देशात अव्वल स्थान राखत आहोत, 'असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले.

भायखळा येथील मसिना हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. मेहरा म्हणाले की, या मोहिमेमध्ये खासगी रुग्णालये महत्वाची भूमिका बजावतात. डॉ. मेहरा म्हणाल्या, “आम्ही खासगी संस्था, गृहनिर्माण संस्था यांच्याशी करार केला आहे आणि संपूर्ण मोहिमेला चालना दिली आहे,” डॉ मेहरा म्हणाले, “आम्हाला नियमितपणे लसीचा डोस मिळाला तरच ही गती पुढे कायम ठेवू शकू,” असे डॉ मेहरा म्हणाले. यापूर्वीची सर्वाधिक संख्या 26 जून रोजी होती, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात 738,708 लोकांना लसी देण्यात आली होती.

दरम्यान, शनिवारी मुंबईत 571 नवीन कोरोना ची प्रकरणे नोंदली गेली असून 18 जण मृत्युमुखी पडले व त्यांची संख्या 15,520 वर पोहोचली आहे. सोमवारी राज्यभरात 224,374 चाचण्या घेण्यात आल्या, तर रुग्ण बरे होण्याची संख्या 8,395 इतकी झाली.

 महाराष्ट्रात सध्या सक्रिय रूग्णांची संख्या 117,575 आहे, तर कोविड -19 मुळे मृत्यूची संख्या आता 122,724 वर पोहोचली आहे. राज्यभरात सध्या 117,575 सक्रिय रूग्ण आहेत, त्यापैकी पुणे 17,106 रूग्णांसह अव्वल आहे, तर ठाणे अनुक्रमे 16,630 सक्रिय रूग्ण आहेत. मृतांची संख्या आता 122,724 वर पोहोचली असून पुण्यात 16,863. मृत्यू तर मुंबईत 15,520 आहेत.

 कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन बंदी मोडत सोमवारपासून आपली दुकाने आणि व्यापार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात कोरोना रुग्ण संख्यांमध्ये वाढ झाल्याने लॉकडाऊन कमी करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.कोल्हापूरच्या शहराच्या व्यापाऱ्यांनी ठामपणे सांगितले की ही प्रकरणे ग्रामीण भागांमधील असून त्यांना विनाकारण लक्ष्य केले गेले आहे. पुणे महानगरपालिकेने लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी दुकानांमध्ये जाऊन कर्मचार्‍यांना लसी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Powered by Blogger.