Header Ad

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात CBI कडून क्लिनचीट


मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली केली होती. परमबीर सिंग यांनी बदलीनंतर अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात देशमुख यांची अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआय ( केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभाग ) कडून चौकशी सुरू आहे.

सीबीआयकडून अनिल देशमुख यांना क्लिनचीट दिल्याचं बोललं जात आहे. 100 कोटी रूपयांच्या वसूली प्रकरणात सीबीआयने 65 पानांचा अहवाल तयार केला आहे. पोलीस उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी अहवाल सादर केला आहे.

अनिल देशमुख यांची चौकशीतून सुटका झाल्यावर त्यांना मोठा दिलासा असणार आहे. उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी सादर केलेल्या अहवालात देशमुख यांच्यावर एकही पुरावा नसल्याची माहिती मिळत आहे. पुराव्याअभावी देशमुख यांना क्लिनचीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, देशमुख यांची सीबीआयकडून प्राथमिक चौकशी झाली आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरोधात एकही पुरावा नाही. पुरावा नसल्याने देशमुख यांच्यावरील 100 कोटी रूपये वसूलीचे आरोप सिद्ध होत नाहीत. म्हणून देशमुख यांची चौकशी थांबवावी, असं या अहवालात नमूद केलं आहे.

Powered by Blogger.