Header Ad

तुम्ही पित असलेल्या चहा मध्ये भेसळ तर नाहीय ना ? कसे ओळखाल जाणून घ्या

पुणे: आपण आपल्या दिवसाची सुरवात एक कप चहाने(Tea) करतो. चहा पिल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. चहा आपली ऊर्जा वाढवण्यास मदत करते. ऑफिसमध्ये कामाचा थकवा दूर करण्यासाठी अनेकदा चहा पिला जातो. पण सावधान तुमच्या आवडीच्या चहा मध्ये भेसळसुद्धा असू शकते.रंगबेरंगी पदार्थ आणि खराब झालेली पाने चहामध्ये भेसळ करतात. यामुळे तुमच्या तोंडाची चव तर खराब होतेच पण असा चहा रोज पिल्याने आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात आपण घरच्या घरी चहा पावडरमधील भेसळ कशी ओळखू शकतो.

चहातील भेसळीचा वाईट परिणाम(Bad effect of adulteration in tea):

चहाच्या पानांमध्ये खराब पाने आणि रंगाची भेसळ करताता. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या आणि रंगीत चहाची भेसळही चहाच्या पानांमध्ये केली जाते. यामुळे यकृताचे विकार आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

खरी आणि बनावट कशी ओळखावी(How to identify true and fake Tea Leaves):

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने त्या संदर्भात नागरिकांना जागरूक करण्यासाठी ट्विट केले आहे की तुम्ही चहामध्ये खराब झालेल्या पानांची भेसळ कशी ओळखू शकता. जाणून घ्या काय आहे मार्ग-सर्व प्रथम एक फिल्टर पेपर घ्या. आता चहाची पाने फिल्टर पेपरवर पसरवून ठेवा. थोडे पाणी शिंपडा जेणेकरून फिल्टर पेपर ओले होईल.जर चहामध्ये भेसळ असेल तर तुम्हाला फिल्टर पेपरवर डाग दिसतील.जर चहा शुद्ध असेल तर फिल्टर पेपरवर कोणताही डाग दिसणार नाही.

 चहा पिण्याचे फायदे(The benefits of drinking tea):

अनेक तज्ञांच्या अभ्यासानुसार, ठराविक प्रमाणात चहा पिल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होतो. चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स(Flavonoids) आणि अँटीऑक्सिडंट्स(Antioxidants)असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. चहा पिणे कोलेस्टेरॉल(Cholesterol) कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

Powered by Blogger.