Header Ad

येत्या 24 तासांत राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा,कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी


पुणेराज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पुन्हा आल्यानं आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराज्याच्या चेहरा पुन्हा आनंदी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्राम घेतला होता. मात्र आता पावसानं पुन्हा रौद्र रुप धारण केलं आहे. राज्यातील काही भागांमध्ये वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. अति पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूरही आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले (WML). येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता.

पुढचे 3 ते 4 दिवस पश्चिम किनारपट्टीवर तुफान वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई-ठाण्यासह उपनगर, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मुसधार - मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असं सांगण्यात आलं आहे.

Powered by Blogger.