सचिन पायलट यांच्या वाढदिवशी त्यांच्या समर्थकांकडून संपूर्ण राजस्थानात वृक्षारोपण करून दिली अनोखी भेट
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या समर्थकांनी मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात लाखो झाडे लावायची मोहीम हाती घेतली आहे आणि संपूर्ण राजस्थानमध्ये काँग्रेसला पाठिंबा आहे असा राजकीय संदेश त्यांनी त्यामधून दिला.
आज सकाळी ११ वाजता ते जयपूर येथील त्यांच्या निवास्थानी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. आज ते 44 वर्षांचे झाले.सचिन पायलट यांचे राजकारणात येणे ठरलेले नव्हते, त्यांनी एमबीए केल्यानंतर पुढील वाटचालीची तयारी करत होते त्याच वेळी त्यांचे वडील राजेश पायलट त्यांचा अपघातात मृत्यू झाला. परिस्थिती अशी झाली की त्यांनी राजकारणात प्रवेश करावा लागला आणि राजेश पायलट ह्यांनी पक्षासाठी घेतलेले परिश्रम बघून सचिन पायलट यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दौसा मतदारसंघातून 1 लाख 20 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आणि वयाच्या 26 व्या वर्षी ते भारतामधले सर्वात तरुण खासदार झाले.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीसीसी) माजी सरचिटणीस महेश शर्मा म्हणाले की, सचिन पायलट यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 200 विधानसभा मतदारसंघात वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे आणि राज्यभरात 10 लाख झाडे लावण्याचे लक्ष्य आहे.
पायलटच्या समर्थकांनी सांगितले की, हि एक विक्रमी मोहीम असेल, जी 2009 मध्ये तत्कालीन डूंगरपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील स्वयंसेवकांच्या एका ग्रुप ने 611,000 रोपे लावण्याच्या एका दिवसाच्या विक्रमाला मागे टाकील .
गेल्या वर्षी, पायलटच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहिमेत 400 शिबिरांमध्ये सुमारे 45,000 युनिट जमा झाले.
