Breaking News- विराट कोहली T20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार
पुणे : टीम इंडियाचा विराट कोहली(Virat Kohli) T20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार आहे असे स्वतःच ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकाच खळबळ उडाली आहे कि असे काय झ्हाले आणि विराट ने हा निर्णय घेतला पण त्याचे कारण अजून कुणालाही कळलेलं नाही. आणि आता टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असणार हे प्रश्न सगळ्या क्रिकेट फॅन समोर उभा राहिला आहे.
🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
आता पर्यंत विराट कोहली ने 95 वनडे आणि 45 T20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. भारताला विराट ने 95 वनडे सामन्यांपैकी 65 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे तर 27 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे, एक सामना टाय आणि 2 सामने अनिर्णयीत राहिले. T20 मध्ये विराट ने कॅप्टन पदाची धुरा सांभाळत 45 सामन्यांपैकी 29 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे तसेच 2 सामन्यांचा लागला नाही.
विराट कोहली ची आयपीएल(IPL)मधील कामगिरी म्हणावी तशी चांगली म्हणता येणार नाही कारण रॉयल चॅलेंजर बंगरुळु साठी कॅप्टन असणाऱ्या विराट कोहली ला संघासाठी आता पर्यंत एकही ट्रॉफी जिंकून देता आली नाही. आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर बंगरुळुसाठी 132 मॅच मध्ये कॅप्टन्सी करून फक्त 62 मॅच मध्ये विजय तर 66 मॅच मध्ये हार पत्करावी'लागली असून बाकीचे 4 सामने अनिर्णयीत राहिले आहे.
