अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक जितेंद्र शिंदे यांचा पगार ऐकून बसेल धक्का सविस्तर वाचा
मुंबई : जितेंद्र शिंदे हे अमिताभ बच्चन यांचे वयक्तिक अंगरक्षक आहेत आणि ते अमिताभ बच्चन यांच्या भारतात तसेच परदेशातील सुरक्षेची काळजी घेतात.
बॉलीवूड चे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे प्रचंड चाहते आहेत आणि ते जिथे जातात तिथे त्यांचे हजारो चाहते त्यांची एक झलक बघण्यासाठी गर्दी करतात.अमिताभ बच्चन घरा पडताच जितेंद्र शिंदे हि व्यक्ती सक्रिय होते. हा माणूस जवळजवळ प्रत्येक चित्रात अमिताभ बच्चन यांच्या सोबत दिसतो.बिग बिसोबत सावलीसारखे राहणारे जितेंद्र शिंदे यांच्या बद्दल अधिक जाणून घेऊया.
जितेंद्र शिंदे हे अमिताभ बच्चन यांचे वयक्तिक अंगरक्षक आहेत आणि ते अमिताभ बच्चन यांच्या भारतात तसेच परदेशातील सुरक्षेची काळजी घेतात. शिंदे अमिताभ बच्चन यांच्या सोबत चित्रपटाच्या शुटिंगपासून ते केबीसी सेट पर्यंत सोबत असतात. जितेंद्र शिंदे यांची स्वतःची सुरक्षा एजन्सी आहे पण ते स्वतःच मिगस्टारचे सरंक्षण करतात.टाइम्स नाऊच्या एका रिपोर्ट नुसार,अमिताभ बच्चन त्यांना वार्षिक १.५ करोड रुपये पगार देतात जे देशातील अनेक खाजगी कंपन्यांच्या सीईओच्या पगारापेक्षा जास्त आहे.
सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि निर्माता एलिजा वूड यांनाही शिंदे यांनी भारत दौऱ्यादरम्यान सुरक्षा पुरवली होती. बिग बींनी शिंदेंना एलिजा वूड याना सुरक्षा पुरवण्यास सांगीतले असल्याचे कळते.शिंदे अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन याना सुरक्षा देत आहेत.
