Header Ad

Happy Birthday- नाटकामध्ये काम करण्यापासून अभिनेता पर्यंतचा राजकुमार रावचा संघर्षमय प्रवास

 मुंबई : 31 ऑगस्ट 1984 रोजी हरियाणातील गुडगाव येथे जन्मलेल्या राजकुमार राव (Rajkummar Rao) याला आज बॉलिवूडमध्ये कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. काहीतरी बनण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन मुंबईत आलेल्या राजकुमारने कठोर संघर्ष करून हे स्थान मिळवले आहे. राजकुमार राव मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, त्यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांचे शौकीन आहे. कदाचित हेच कारण होते की, लहानपणापासूनच त्याला चित्रपटांमध्ये झळकण्याची आवड निर्माण झाली होती. त्यानी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून प्रशिक्षण घेतले आणि नंतर तो मुंबईला रवाना झाला.

मात्र, मुंबईत आल्यानंतर राजकुमार राव याला बराच काळ संघर्ष करावा लागला. शेकडो ऑडिशन्स दिल्या, रांगेत उभा राहिला, खूप प्रयत्न केले आणि नंतर ‘लव सेक्स और धोका’ या चित्रपटात त्याची वर्णी लागली. 2010 मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले होते. यानंतर राजकुमार राव ‘रागिनी एमएमएस 2’, ‘गँग्स ऑफ वासेपूर भाग 2’ सारख्या अनेक चित्रपटांत सहाय्यक भूमिकांमध्ये दिसला. राजकुमार राव याला ‘काई पो चे’ या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्याच्यासोबत सुशांत सिंह राजपूतही मुख्य भूमिकेत होता.

तो क्षितीज रेपर्टर आणि श्रीराम सेंटरसोबत नाटक करत असे. त्याने आपलं पदवीचं शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सनातन कॉलेजमधून पूर्ण केलं होतं. राजकुमार रावला हे यश इतक्या सहजासहजी नाही मिळालं त्यासाठी त्याने खुपचं कष्ट घेतले आहेत. त्याने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
की त्याला ऑडीशनमध्ये अनेकवेळा नकार मिळाला होता. त्यावेळी त्याच्या खिशात पैसेसुद्धा नसायचे. एक वेळ राजकुमारने म्हटलं होतं मी माझ्या वाट्यातून 7 हजार रुपये देत असे आणि ती रक्कम माझ्यासाठी खुपचं मोठी होती. एकवेळ असं झालं होतं, की माझ्या खात्यात फक्त 18 रुपये राहिले होते आणि माझ्या मित्राच्या खात्यात 23 रुपये.राजकुमार रावने आपल्या कारकिर्दीची सुरुवात लव्ह सेक्स और धोका मधून केली होती. तसेच त्याने शैतान, शादी मै जरूर आना काय पो छे यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या शाहिद या चित्रपटासाठी तर त्याला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Powered by Blogger.