मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय मथुरेत दारू आणि मांस विक्रीवर बंदी.
लखनऊ - काल श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रमात उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी खूप मोठा निर्णय जाहीर केला आहे..मथुरा शहरात मांस आणि दारूविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोमवारी हा निर्णय जाहीर केला आहे. मथुरेतील वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, गोकुळ, महावन आणि बलदेव भागात मांस आणि दारूविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या व्यवसायाशी निगडित व्यापारी आणि कामगारांचे इतर व्यवसायात पुर्नवसन केले जाईल असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, चार वर्षापूर्वी मथुरा, वृंदवन नगर यांची एक महानगरपालिका व्हावी अशी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार इथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. नंतर सात पवित्र स्थळांना तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला. या पवित्र ठिकाणी दारू आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी जनतेची इच्छा होती. त्याप्रमाणे मथुरेत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्यात आहे. जिल्हा प्रशासनला कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, 'या व्यवसायाशी जे निगडीत लोक असतील त्यांना इतर कामाचे प्रशिक्षण देऊन इतर व्यवसायांमध्ये त्याचे पुर्नवसन केले जाईल.' या व्यावसायिकांनी आणि कामगारांनी दुग्धव्यवसायाची छोटी दुकाने सुरू करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
