सर्वसामान्यांना मोठा फटका, LPG गॅस च्या दरात पुन्हा वाढ; 15 दिवसांत 50 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर
LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे.
वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती.
दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या LPG Cylinder चा दर 884.50 रुपये इतका झाला आहे.
दिल्लीत यावर्षात जानेवारीमध्ये LPG Cylinder चा दर 694 रुपये होता, तो फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये इतका झाला. त्यानंतर 15 फेब्रुवारीला पुन्हा एकदा दर वाढवण्यात आल्याने सिलेंडरची किंमत 769 रुपये झाली. त्यानंतर फेब्रुवारीमध्येच पुन्हा दुसऱ्यांदा वाढ झाली. 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडर 794 रुपये झाला. मार्चमध्ये दर वाढून 819 रुपये इतका झाला.
