सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्य तेलाचे दर कमी होणार, वाचा सविस्तर
नवी दिल्ली | गेल्या वर्षापासून आतापर्यंत खाद्यतेलाच्या किमतीमध्ये जवळजवळ 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. आगामी उत्सवाच्या काळामध्ये खाद्य तेलाच्या किमती भडकू नये, यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना चालूच आहेत.
आज सरकारने कच्च्या पाम, सोयाबीन, सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर या उत्पादनावरील कृषी अधिभार रद्द केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मार्च 2022 पर्यंत होणार आहे. यामुळे खाद्य तेलाचे दर कमी होतील.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महत्वाचा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. गगनाला भिडलेली महागाई आणि येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमुळे सर्वसामान्यांवरचा ताण वाढला होता. एकंदर परिस्थिती बघता केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किंमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

या सणासुदीच्या काळात खाद्यतेल स्वस्त व्हावं यासाठी केंद्र सरकारने सोयाबीन, सुर्यफुल आणि पाम कच्या तेलावरील कृषी करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाच्या अर्थात सीबीआयसीच्या अधिसूचनेनुसार कच्च्या पाम तेलावर 7.5 टक्के कृषी विकास उपकर आकारला जाणार आहे.
तर कच्च्या सूर्यफूलाच्या तेलावर आणि कच्च्या सोयाबीन तेलावर कृषी विकास उपकर हा 5 टक्के असणार आहे. सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या कच्च्या प्रकारावर 5.5 टक्के तर पाम तेलाच्या कच्च्या प्रकारावर 8.25 टक्के सीमा शुल्क असणार आहे. कृषी करातील ही कपात 14 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत लागू राहणार असल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.