Header Ad

Petrol-Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ, पुण्यात पेट्रोल १०९ पार; जाणून घ्या आजचे दर

 वाढत्या पेट्रोल(Petrol) आणि डिझेलच्या(Diesel) किंमतींमुळे देशातल्या नागरिकांवर अधिकच बोजा टाकत आहेत. वाढत्या किंमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या वर गेल्या आहेत. खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरपर्यंत किंमती वाढतच आहेत. तेल कंपन्यांनी रविवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले ​​असून मुंबईत पहिल्यांदाच डिझेलची किंमत १०० च्या पुढे गेली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले ​​आहेत. डिझेलच्या दरात प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, पेट्रोलच्या दरात ३० पैसे प्रति लिटर वाढ होऊन विक्रमी पातळीवर आहे. दिल्लीतील पेट्रोल १०४.१४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेलचा दर ९२.८२ रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल ११०.१२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल १००.६६ रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.८० रुपये तर डिझेल ९५.९३ रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.५३ रुपये लिटर आणि डिझेल ९७.२६ रुपये प्रति लीटर आहे.

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारपासून त्यांच्यावरील किंमतीचा मोठा भाग ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली आहे. देशात शुक्रवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३० पैसे, तर डिझेलच्या दरात ३५ पैसे इतकी वाढ झाली होती. तर शनिवारी पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत ३० पैसे प्रति लीटरने तसेच डिझेलच्या किंमतीत ३५ पैसे प्रति लिटरने वाढ करण्यात आली होती.

ऑक्टोबर महिन्यात केवळ ९ दिवसात पेट्रोल २.२० रुपयांनी आणि डिझेल २.६० रुपयांनी महाग झाले आहे. कच्च्या तेलाची वाढती मागणी यामुळे इंधनाची किंमत ८० डॉलर पार केली आहे आणि येत्या काही दिवसात ती ९० डॉलर पर्यंत जाऊ शकते. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती २ ते ३ रुपयांनी वाढू शकतात

Powered by Blogger.