आर्यन खानचा क्रूझवरील ड्रग्स प्रकरणात झालेल्या अटकेचा जामीन नाकारला, आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार
मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan)इतर सात आरोपींना काल दि. 7 रोजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांच्या जामीनासाठी कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र किल्ला कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीनासाठी आता सत्र न्यायालयात अर्ज कारावा लागणार आहे. त्यामुळे आजची रात्रही आर्यन खानला जेलमध्येच घालवावी लागणार.
आर्यन खानसह अन्य आरोपींची कोठडी संपणार असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. या सुनावणीवेळी न्यायालयात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी रंगली. आर्यन खानच्या बाजूने ऍड. मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. या वकिलांचा युक्तिवादानंतर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर आज किल्ला कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला मात्र, तो जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. कोर्टाने जामीन रद्द करण्याचे कारण असे सांगतिले कि जामीन मंजूर झाल्यास पुढील कारवाई मध्ये अडथळा येऊ शकतो. याप्रकरणी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.